Thursday, June 16, 2016

Back Benchers Episode #1 Trailer | ShotPut Films

GOOD NEWS GUYS !

Trailer of our Upcoming Marathi webseries "BACK BENCHERS" is out on youtube.

Please hit the link to have a look and Express yourself with the exact feelings after seeing it.

Thanks for the Support and encouragement from you guys.



Thursday, March 31, 2011

Sometimes being good is not good enough.......
Just be strong, when the going gets tough.......
You are better than him; still he is your boss......
Don't be in a hurry, don't try to cross.......
Wait for your time and stick to your goal.......
Sure one day, diamond will come out of the coal.......
Those who say, you are good for nothing.......
They'll only speak, "i knew this guy will do something "...........

Sometimes being good is not good enough.......
Just be strong, when the going gets tough.......
Out in the world, there are many who are good......
To stand above all, speak with yourself, "yes, I should "........
Talented people, they just come and go.........
But only few from a million, can really show...........
When the time is gone there is nothing you can do.........
So think a lot ......, you have to.......

Sometimes being good is not good enough........
Just be strong, when the going gets tough........
Help yourself, nobody else will do.........
Remember my words, this is true........
You know what you have, not your mom n dad...........
So find yourself, before you get mad........
You have something special, that's all I have to say.......
Just find it; there sure will be a way......
Then you'll be a King or Queen..... World will be at your ground.......
And that'll be theday, you will make your parents proud!!!

Sometimes अभि..

Monday, January 10, 2011












आज तसा उशीरच झाला ऑफिसला यायला ..
खरंतर निघायला .......नाही ! काल झोपायला ......  

कारणं खरी.....बरोबर हि.....पण ध्येय चुकवणारी..  
ध्येय सुद्धा पक्के पण routine हलवणारे ..  

वेळ द्यायला हवा......पण कोणाला ?  
Routine बदलण्यासाठी ? कि स्वतःसाठी ?  

ध्येय तरी पक्के आहे काय रे तुझे ? 

कि त्यासाठी हि हवाय................वेळ ?  
खरंच वेळ द्यायला हवा.......वेळ न घालवण्यासाठी.  

अभि..


Saturday, January 8, 2011





 
 






कधी कधीच खरे बोलतो मी  
दुःखात नुसताच हसतो मी  
दिवसात रात्र झाली माझी  
रात्रीत दिवस शोधतो मी 
काय करतो मी ? सूर्य देवाचे आगमन झाले कि,  
निराशतेचे स्वःत्वाचे आणि कशाचे नाही असे अंथरूण पांघरून
निराशतेच्या कुशीत झोपी जातो  
जागरुकता पुरवत असते ज्ञान साऱ्या जगाला  
झोपेत असलो तरी जाणवत थोडंसं काही  
पण करणार काय.. झोपेत वाईट असे चांगले चालणेही जमत नाही  
संध्याकाळच्या साखरझोपेत जेव्हा उघडतात पापणीभर डोळे.. 
तेव्हा जागरुकता आपले जाणिवेचे गाठोडे बांधून निघत असते. 
बघते माझ्याकडे आणि हसते खुदकन.. 
विचार येतो आतातरी धरावेत तिचे पाय.  
पण तिच्या schedule मध्ये overtime ची भानगडच नसते  
मध्यरात्री जेव्हा उघडतात डोळे भुवईपर्यंत  
आणखी एक दिवस फुकट, ह्याची वाटते खंत  
आता रात्र तरी व्हावी फायदेशीर, म्हणून उठतो खरा  
समजूत घालतो स्वतःची, कि सूर्यापेक्षा आपला काजवाच बरा 
असंख्य काजवे घेऊन शोधले तरी सापडतील का हे जाणिवेचे दव ? 
गाढवाला येईल का कधी गुळाची चव ?  
प्रश्न ! प्रश्न ! प्रश्न !
जसे हे प्रश्न सुचतात तशी उत्तरं का सुचत नाहीत ?  
हा हि एक यक्षप्रश्नच ...  
अभि..






















अशीही माणसे भेटतात जी सांगतात  
कि बाळ आधी न्हाणीघर.... मग देवघर.. 
आंघोळीशिवाय जाऊ नये देवालयात.. 
पण खरंच देवाला रोज अंघोळ करून दर्शन घेणारा भक्त हवा असतो ? 
कि अंतर्देहाला एकदाच अंघोळ घातलेला नास्तिक ?

अशीही माणसे भेटतात जी सांगतात कि कर्म करावे फळाची अपेक्षा करू नये.. 
पण मला फळ खाऊन कर्म करायचे असेल तर ?.. 
आधी पोटोबा मग विठोबा..  

गैर काहीच नाही.. 
गैर असतात समजुती.. 
रद्दड रटाळ अश्या जुन्या वर्तमानपत्रासारख्या.. 

अशी माणसे भेटतात का हो ? जी जुना वर्तमानपत्र काढून वाचतात ? 
मग हे समजुती समजावणारी माणसे का भेटतात ?  
निर्माता हे समजुती निर्मितीचे कर्म करून केव्हाचा निघून गेला. 
पण त्याची फळ आपण आजही भोगतो आहोत..  
ह्या निर्मात्याचा काही स्वार्थ असावा ह्या साऱ्यापाठी.. 
जगणे झाले आहे अंधारमय... ना एकही दिवा ना हाती काठी.  

आता तर अंधार इतका गडद झाला आहे कि आशेचा किरणही ढून्कत नाही जवळपास..
जरी समजुती पाळण्यात झालो असलो सारपास तरी आयुष्याच्या परिक्षेत मात्र.....नापास  

अभि..

घडण

















विचाराल मला तर सहसा मी गप्पच असतो  
प्रत्येकवेळी विचारणारा वाटतो विचारवंत 
आणि तिथेच मी फसतो ..

ह्यावर मला विचाराल असे का ? 
तरिही मी गप्पच..

या मौनाचे गूढ शोधण्याचा जेवढा प्रयत्न करावा, 
तेवढा पाय ह्या मौनाच्या दलदलीत खोल खोल रुतत जातो 

आशा आहे कि एक दिवस ह्याच दलदलीतून एक कमळ जन्मास येईल 
मौनाचे रुपांतर अखेर भाषांतरात होईल  

पण असाही विचार मनात डोकावतो कि, 
कमळ दलदलीत न उगवता, एखाद्या फुलबागेत उगवले असते तर ? 
वाटले असते का तितकेच सुंदर ? 
कदाचित नाही..  

एखाद्याची घडणच असते अशी..  
संथ वाहणाऱ्या नदीसारखी  
तिला हि खळखळाट असतोच कि 
समुद्राच्या लाटांची नसेल सर त्याला  
पण.. तरिही नदीची ओढ असतेच ना! 
नकळत का होईना पण पाय नदीत उतरतातच ना ! 
काही क्षणांसाठी का होईना पण हे भकास आयुष्य, रम्य वाटतेच ना!  

खात्री आहे कि हि नदीही एक दिवस समुद्रमय होणार  
खळखळाटाचे रुपांतर अखेर लाटांत होणार  
पण त्यासाठी ह्या कालबद्ध गोष्टी विचारबद्ध करण्याची खरंच आवश्यकता आहे ? 

कदाचित नाही..  

का हवाय मला कमळ चिखलातच.. 
का असं वाटतं कि नदीचा समुद्र कधी होऊच नये.. 
का हवाय मला समुद्रही समुद्रासारखाच..  

कारण.. 
एखाद्याची घडणच असते अशी..  

अभि..